Friday, 30 November 2012

Malvani Kolambi Masala

MALVANI KOLAMBI MASALA



साहित्य:-
१ वाटी सोललेली मोठी कोलंबी
१ मोठा बटाटा बारीक फोडी करून
१ नारळ
१ तुकडा आल
४ पाकळ्या लसून
२ मोठे कांदे उभे चिरलेले
कोथिंबीर
हळद
२ चमचे मालवणी मसाला
तेल फोडणीसाठी
२-३ कोकम
मीठ
गरम मसाला
५-६ मिरी
अर्धा तुकडा दालचिनी
थोड  जायफळ किसलेले
खसखस
कृती
१.प्रथम कढईत कांदा लालसर परतून घ्यावा.
२.त्यात खोबरे घालून ते सुद्धा लालसर होई पर्यंत भाजावे.
३.आल,लसून,कोथिंबीर घालून नीट परतून घ्यावे. सर्व गरम मसाला घालून भाजून घ्यावे.
४.थंड करून मिक्सर मध्ये बारीक वाटावे.
५.कोलंबीला मीठ लावून १० मिनिटे  ठेवावे. स्वच्छ धुवून घ्यावी.
६.कोलंबी आणि बटाट्याच्या फोडींना वरील वाटण लावावे.
७.तेलात कांदा परतून त्यात कोलंबी आणि बटाटा घालावा.
८.बटाटा शिजल्यावर त्यात उरलेले वाटण,मीठ,हळद,कोकम टाकून नीट ढवळावे.
९.थोडे पाणी टाकून मटना  सारखे घट्ट शिजवावे.

No comments:

Post a Comment