साहित्य:
बटाटे
सोलून घ्या, थोडे मोठे बटाटे घ्या. हिरवी मिरची व कोथिंबीर बारीक चिरा,
खवा हाताने कुचकरा, त्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, काजू,
बेदाणे टाका.
एका कढईत तूप गरम करा. बटाटे तळून घ्या. तळताना बटाट्यांवर चाकूने भोक पाडा, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. गार झाल्यावर चमच्याने बटाटा आतून पोकळ करा व त्यात खव्याचे मिश्रण भरा.
ग्रेवीसाठी टॉमेटो मिक्सरमधून काढा, कांदा, आल, हिरवी मिरची एकत्र मिक्सरमधून काढा. एका कडईत तूप गरम करून कांद्याची पेस्ट परतून घ्या. थोड्यावेळाने त्याच्यात टॉमेटोची पेस्ट टाकून २-३ मिनीटे परता.
आता त्याच्यात मीठ, लाल तिखट, हळद व दही ताकून परता, चांगले परतल्यावर बटाट्याचा आतील भाग व उरलेला खवा टाका. १ मिनिटांनी ३ कप पाणी टाकून शिजवा ग्रेवी शिजल्यावर त्याच्यात भरलेले बटाटे व गरम मसाला टाकून २ मिनीटे झाकून मग गॅस बंद करा. गरम-गरम वाढा.
- बटाटे ६
- १०० ग्रॅम खवा
- कोथिंबीर
- १ हिरवी मिरची
- ३ काजू
- ६ मनुके
- मीठ चवीप्रमाणे
- १/४ लहान चमचा लाल तिखट
- तूप तळण्यासाठी
- ३ कांदे
- ४ टॉमेटो
- १ तुकडा आले
- १ हिरवी मिरची
- १/२ कप दही
- मीठ चवीप्रमाणे
- १/४ लहान चमचा लाल तिखट
- १/४ लहान चमचा हळद
- १/२ चमचा जीरे
- १/४ लहान चमचा गरम मसाला
- २ मोठे चमचे तूप
| Kashmiri Dam Aaloo |
काश्मीरी दम आलू
एका कढईत तूप गरम करा. बटाटे तळून घ्या. तळताना बटाट्यांवर चाकूने भोक पाडा, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. गार झाल्यावर चमच्याने बटाटा आतून पोकळ करा व त्यात खव्याचे मिश्रण भरा.
ग्रेवीसाठी टॉमेटो मिक्सरमधून काढा, कांदा, आल, हिरवी मिरची एकत्र मिक्सरमधून काढा. एका कडईत तूप गरम करून कांद्याची पेस्ट परतून घ्या. थोड्यावेळाने त्याच्यात टॉमेटोची पेस्ट टाकून २-३ मिनीटे परता.
आता त्याच्यात मीठ, लाल तिखट, हळद व दही ताकून परता, चांगले परतल्यावर बटाट्याचा आतील भाग व उरलेला खवा टाका. १ मिनिटांनी ३ कप पाणी टाकून शिजवा ग्रेवी शिजल्यावर त्याच्यात भरलेले बटाटे व गरम मसाला टाकून २ मिनीटे झाकून मग गॅस बंद करा. गरम-गरम वाढा.
No comments:
Post a Comment